ENG vs SL: इंग्लंडला विजयी हॅटट्रिकची संधी, श्रीलंका रोखणार का?

| Updated on: Sep 05, 2024 | 11:30 PM

England vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्याला 6 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ENG vs SL: इंग्लंडला विजयी हॅटट्रिकची संधी, श्रीलंका रोखणार का?
ENG vs SL
Image Credit source: bcci
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे. धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचा कर्णधार आहे. तर बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात ओली पोप याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसाठी हा सामना प्रतिष्ठेचा असा असणार आहे. त्यामुळे श्रीलंका इंग्लंडला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

प्लेइंग ईलेव्हन जाहीर

इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने 4 सप्टेंबरला प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने टीममध्ये एक बदल केला. मॅथ्यू पॉट्स याच्या जागी जोश हल याचा समावेश करण्यात आला आहे. तर श्रीलंकेने अंतिम सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. विश्वा फर्नांडो आणि कुसल मेंडीस यांचं पुनरागमन झालं आहे. या दोघांना पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर दुसऱ्या कसोटीतून डच्चू दिला होता. मात्र आता पु्न्हा त्यांना संधी दिली गेली आहे. तर निशान मदुशंका आणि प्रभाथ जयसूर्या या दोघांना बाहेर केलं आहे.

जोश हल पदार्पणासाठी सज्ज

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रत्नायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.