इंग्लंड क्रिकेट टीम मायदेशात पाहुण्या श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 6 सप्टेंबरपासून केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहे. या तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. एका बाजूला इंग्लंड विजयी हॅटट्रिक करण्यासाठी उत्सूक आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका हा सामना जिंकून इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट करण्याच्या प्रयत्नात आहे. अशात एक युवा खेळाडू या सामन्यातून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तयार झाला आहे. इंग्लंडचा युवा खेळाडू केनिंग्टन ओव्हल येतथे कसोटी पदार्पण केलं आहे.
श्रीलंकेने सामन्याच्या पूर्वसंध्येला प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. श्रीलंकेने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले. विश्वा फर्नांडो आणि कुसल मेंडीस यांना संधी दिली गेली. तर निशान मदुशंका आणि प्रभाथ जयसूर्या यांना बाहेर बसवण्यात आलं. तर इंग्लंडने सामन्याच्या 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं. जोश हल हा 20 वर्षीय खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहे. हलला दुखापतग्रस्त मार्क वूड याच्या जागी संधी दिली गेली. मात्र हलला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मात्र आता तिसऱ्या सामन्यात मॅथ्यू पॉट्स याला वगळून हलला संधी दिली गेली आहे. मॅथ्यूला याआधीच्या दोन्ही सामन्यात काही खास करता आलं नाही. मॅथ्यूने दोन्ही सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे जोशला संधी मिळाली. आता जोश पदार्पणात कशी कामगिरी करतो, याकडे इंग्लंडच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
😍 Making his debut
📞 The phone call from Baz
🫂 Entering the Test environment
🔥 Working with Stokesy and the boys📺 Watch in full as Josh Hull looks ahead to his Test debut 👇
— England Cricket (@englandcricket) September 5, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रत्नायके आणि विश्वा फर्नांडो.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.