इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. श्रीलंका या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. इंग्लंडने दोन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंड मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता इंग्लंडकडे तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचा इंग्लंडवर मात करुन या दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेटने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. बेन स्टोक्सला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागल्याने ओली पोप याच्याकडे नेतृत्वाची सूत्रं आहेत. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. इंग्लंडने मॅथ्यु पॉट्स याच्या जागी 20 वर्षीय युवा खेळाडूचा समावेश केला आहे. वेगवान गोलंदाज जोश हल याला पदार्पणाची संधी दिली गेली आहे.
जोश हल याला 10 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव आहे. जोशने या 10 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. जोशची श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र मार्क वूड याला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मार्कला या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे मार्कच्या जागी जोश हल याचा समावेश करण्यात आला.
जोश हल पदार्पणासाठी सज्ज
A special moment ❤️
Congratulations, Josh 👊
— England Cricket (@englandcricket) September 4, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेंस, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ, क्रिस वोक्स, गस एटिंक्सन, ओली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.
कसोटी मालिकेसाठी श्रीलंका टीम: धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, निशान मदुष्का (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन प्रियनाथ रथनायके, विश्व फर्नांडो, कसून रजिथा, निसाला थाराका, जेफ्री वेंडरसे, रमेश मेंडिस, सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस.