Pathum Nissanka : शतक 1 विक्रम अनेक, पाथुम निसांकाकडून रेकॉर्डसची रांग

| Updated on: Sep 09, 2024 | 8:31 PM

England vs Sri Lanka 3rd Test : पाथुम निसांका याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीत नाबाद शतकी खेळी करत श्रीलंकेला विजयी केलं. पाथुमने या खेळीसह इतिहास रचला आहे.

Pathum Nissanka : शतक 1 विक्रम अनेक, पाथुम निसांकाकडून रेकॉर्डसची रांग
Pathum Nissanka Sri Lanka
Image Credit source: England Cricket X Account
Follow us on

श्रीलंकेने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने 219 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. पाथुम निसांका श्रीलंकेच्या विजयाचा नायक ठरला. निसांकाने नाबाद शतक केलं. निसांकाने केलेल्या या खेळीमुळे श्रीलंकेला इंग्लंडमध्ये 10 वर्षांनंतर कसोटी सामन्यात विजय मिळवता आला. पाथुमने या शतकी खेळीसह अनेक विक्रम केले आहेत. पाथुमने नक्की काय काय केलंय? जाणून घेऊयात.

पाथुमने 124 बॉलमध्ये 102.42 च्या स्ट्राईक रेटने 127 धावांची खेळी केली. पाथुमच्या या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. पाथुम यासह 2024 या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय (टेस्ट+वनडे+टी20i) धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. पाथुमने आतापर्यंत या वर्षात 1 हजार 135 धावा केल्या आहेत. पाथुमने याबाबत कुसल मेंडीस याला मागे टाकलं. कुसल मेंडीस याच्या नावावर 1 हजार 111 धावांची नोंद आहे. तर टीम इंडियाचा यशस्वी जयस्वाल तिसऱ्या स्थानी आहे. यशस्वीने या वर्षात 1 हजार 33 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा 990 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडच्या जो रुट याने 986 धावा केल्या आहेत.

पाथुम इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना करताना शतक करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. निसांकाआधी गॉर्डन ग्रीनिज, आर्थर मॉरीस, डॉन ब्रॅडमॅन, ग्रॅम स्मिथ, शाई होप आणि कॉनराड हंट फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करता शतक केलं होतं. तसेच पाथुम चौथ्या डावात शतक करणारा श्रीलंकेचा पाचवा फलंदाज ठरला आहे.

पाथुमची शतकी खेळी


श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.