इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 6 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे करण्यात आलं आहे. यजमान इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने यासह मालिकाही जिंकली आहे. आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहे. श्रीलंकेने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. श्रीलंकेने या अंतिम सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. श्रीलंका टीम मॅनेजमेंटने कुणाला संधी दिलीय आणि कुणाला बाहेर केलंय? हे जाणून घेऊयात.
निशान मदुशंका आणि प्रभाथ जयसूर्या या दोघांना बाहेर केलं आहे. तर या दोघांच्या जागी कुसल मेंडीस आणि विश्वा फर्नांडो या दोघांचा समावेश केला आहे. कुसल मेंडीस याला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र कुसलला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. कुसलने पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे 24 आणि 0 अशा धावा केल्या. त्यामुळे कुसलला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आलं. मात्र त्यानंतर आता गेल्या दोन्ही सामन्यात ओपनिंग करणाऱ्या निशान मदुशकाच्या जागी संधी दिली गेली आहे.
तसेच श्रीलंकेने केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळपट्टीनुसार अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे प्रभाथ जयसूर्या याच्या जागी वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याला संधी दिली आहे. विश्वाने पहिल्या सामन्यात 2 विकेट्सच घेतल्या होत्या. त्यामुळे विश्वाला टीममधून बाहेर काढलं होतं. मात्र त्याचा आता पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचे 11 शिलेदार
🚨Team Updates🚨
Sri Lanka Playing XI for the 3rd Test Match vs England.
1. DIMUTH KARUNARATHNE
2. PATHUM NISSANKA
3. KUSAL MENDIS
4. ANGELO MATHEWS
5. DINESH CHANDIMAL
6. DHANANJAYA DE SILVA (Captain)
7. KAMINDU MENDIS
8. MILAN RATHNAYAKE
9. VISHWA FERNANDO
10. LAHIRU KUMARA…— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 5, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रत्नायके आणि विश्वा फर्नांडो.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.