ENG vs SL Toss : श्रीलंकेचा इंग्लंड विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, जॉश हलचं पदार्पण

| Updated on: Sep 06, 2024 | 3:49 PM

England vs Sri Lanka 3rd Test Toss: श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. श्रीलंकेने इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

ENG vs SL Toss : श्रीलंकेचा इंग्लंड विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, जॉश हलचं पदार्पण
Dhananjaya de Silva 3rd test toss
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर ओली पोप याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचा इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे.

दोन्ही संघांमध्ये बदल

इंग्लंड आणि श्रीलंका दोन्ही संघांनी या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. इंग्लंडने मॅथ्यु पॉट्स याच्या जागी युवा जॉश हल याला संधी दिली आहे. जॉशचं यासह कसोटी पदार्पण झालं आहे. तर श्रीलंकेने 2 बदल केले आहेत. विश्वा फर्नांडो आणि कुसल मेंडीस या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. तर निशान मदुशंका आणि प्रभाथ जयसूर्या या जोडीला प्लेइंग ईलेव्हनमधून वगळलं आहे. दोन्ही संघांनी सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती.

हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 38 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 38 पैकी 19 सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेला 8 वेळा विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर 11 सामने अनिर्णित राहिले.

इंग्लंडने टॉस गमावला

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.