वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेची सांगता झाली आहे.त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आणि पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तानने एकूण 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडनेही श्रीलंके विरूद्धच्या 3 मॅचच्या टेस्ट सीरिजमधील सलामीच्या सामन्यासाठी आपल्या 11 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. हॅरी ब्रूक याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही धनंजया डी सिल्वा याच्याकडे आहे.
इंग्लंडला या मालिकेआधी 2 झटके लागले. नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेत हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यामुळे बेन स्टोक्सला मालिकेतून बाहेर पडावं लागलं. तर झॅक क्रॉली याला बोटाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे उपकर्णधार असलेल्या ओली पोप याला नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. तर हॅकी ब्रूक उपकर्णधार म्हणून पोपला मदत करेल. तसेच
वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स याची जून 2023 इंग्लंड टीममध्ये एन्ट्री झाली आहे. तर झॅक क्रॉलीच्या अनुपस्थितीत डॅन लॉरेन्स हा ओपनिंग करेल.
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.
दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.
तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल
इंग्लंडची पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन
Two changes 🔄
We’ve named our XI for the first Test against Sri Lanka 🏏#ENGvSL | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) August 19, 2024
श्रीलंके विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर
टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.