SL vs IND: श्रीलंका-इंडिया सीरिजनंतर बदलाची तयारी, टीमला मिळणार नवा कोच!

| Updated on: Aug 11, 2024 | 5:42 PM

श्रीलंकेने टीम इंडियावर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने मात केली. श्रीलंकेला यासह 1997 नंतर 27 वर्षांनी टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश आलं.

SL vs IND: श्रीलंका-इंडिया सीरिजनंतर बदलाची तयारी, टीमला मिळणार नवा कोच!
sanath jaysurya and gautam gambhir
Image Credit source: PTI
Follow us on

टीम इंडियासाठी श्रीलंका दौरा हा बरोबरीचा राहिला. उभयसंघात टी20i आणि वनडे सीरिज खेळवण्यात आली. टीम इंडियने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 3-0 अशा फरकाने टी 20i मालिका जिंकली. मात्र त्यानंतर जे झालं त्याने इतिहास रचला. श्रीलंकेने टीम इंडियाचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर श्रीलंकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. श्रीलंकेने अशाप्रकारे 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनी द्विपक्षीय मालिका जिंकली. त्यानंतर आता श्रीलंका इंग्लंड दौरा करणार आहे. श्रीलंकेच्या या दौऱ्याची सुरुवात 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे.

श्रीलंकेच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल श्रीलंकेसह सपोर्ट स्टाफमधून जोडला जाणार आहे. स्थानिक मीडियानुसार, श्रीलंकेचे अंतरिम हेड कोच सनथ जयसुर्या याच्या विनंतीनंतर इयन बेल श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी होणार आहे.

दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2023-25 स्पर्धेच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंना इंग्लंडमधील स्थितीची चांगली माहिती व्हावी, यासाठी इयन बेलचा समावेश केला जाणार आहे. इयन बेलला इंग्लंडमधील परिस्थितीचा तगडा अनुभव आहे. त्याच्या या अनुभवाचा श्रीलंकेला कितपत फायदा होतो, हे स्पष्ट होईलच. सध्या इंग्लंड डब्ल्यूटीसी पॉइंट्स रँकिंगमध्ये 36.54 टक्क्यांसह सहाव्या स्थानी आहे. तर श्रीलंका 50 टक्क्यांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरीत कायम राहण्यासाठी या मालिकेत विजय महत्त्वाचा असणार आहे.

इयन बेल इंग्लंड विरुद्ध श्रीलंकेला मदत करणार

इयन बेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

इयन बेलन याने इंग्लंडचं 118 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 8 टी20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. इयनने कसोटीत 42.69 च्या सरासरीने 7 हजार 727 धावा केल्या आहेत. यामध्ये 46 अर्धशतकं आणि 22 शतकांचा समावेश आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये इयनने 37.87 च्या सरासरीने 5 हजार 146 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 35 अर्धशतकं आणि 4 शतकांचा समावेश आहे. तसेच इयनने टी 20i क्रिकेटमध्ये 188 धावा केल्या.