श्रीलंका क्रिकेट संघाने टीम इंडियाचा 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. उभयसंघातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर श्रीलंकेने उर्वरित 2 सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली. श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध तब्बल 27 वर्षांनंतर एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश आलं. या मालिकेनंतर आता श्रीलंका इंग्लंड दौऱ्यावर आहे. श्रीलंका इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेला या मालिकेआधी नवा बॅटिंग कोच मिळाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याची श्रीलंकेच्या बॅटिंग कोच या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इयन बेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्यात श्रीलंका इंग्लंड विरुद्धच खेळणार असल्याने इयन बेल याचा बॅटिंग कोच म्हणून चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांना इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळतं घेण्यासाठी बेलचा अनुभव फायदेशीर ठरेल.
दरम्यान दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक आहे. सनथच्या मार्गदर्शनातच श्रीलंकेने इतिहास रचला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर श्रीलंकेने दणक्यात कमबॅक करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. दरम्यान आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या 21 ऑगस्टपासून मॅन्चेस्टर येथे सुरुवात होणार आहे.
इयन बेलला मिळाली मोठी जबाबदारी
Sri Lanka Cricket appointed former England batsman Ian Bell as the ‘Batting Coach’ of the national team for the ongoing tour.https://t.co/CvaM44DSM0 #ENGvSL
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 13, 2024
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.
दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.
तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम: बेन स्टोक्स (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, ओली पोप (उपकर्णधार), जो रूट, जॉर्डन कॉक्स, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मार्क वुड, शोएब बशीर, ओली स्टोन आणि मॅट पॉट्स.
टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.