इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ट्रेन्ट ब्रिज, नॉटिंघम येथे करण्यात आलं आहे. यजमान इंग्लंड 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने पहिला सामना हा 1 डाव आणि 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने जिंकला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजसाठी इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा करो या मरो असा आहे.
उभयसंघातील पहिला सामना हा लॉर्ड्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आला. इंग्लंडने क्रिकेटच्या पढंरीत विंडिजला तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 114 धावांनी पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडिजसमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल किंवा सामना ड्रॉ करावा लागेल. त्यामुळे विंडिज या सामन्यात संपूर्ण ताकदीने उतरेल.
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी सामन्यांच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी एकमेव बदल केला आहे. जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी मार्क वूड याला संधी दिली आहे. तर विंडिजने पराभवानंतरही आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीम जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीनंतर पहिल्यांचा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या इतर गोलंदाजांवर आता मोठी जबाबदारी असणार आहे.
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.