इंग्लंड क्रिकेट टीमने पाहुण्या वेस्ट इंडिज विरुद्ध सलामीच्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन हे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर 3 ते 5 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं. इंग्लंडने हा सामना तिसऱ्याच दिवशी जिंकला. इंग्लंडने विंडिवर 1 डाव आणि 114 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघ दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.
क्रेग ब्रेथवेटकडे विंडिजच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड टीममध्ये जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीनंतर दुसर्या सामन्यासाठी संघात मार्क वूड याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने मार्क वूडच्या रुपात या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंमध्ये एकमेव बदल केला आहे. तर विंडिजची प्लेइंग ईलेव्हन अजून जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध विंडिज दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी 18 जुलैपासून होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध विंडिज दुसरा कसोटी सामना ट्रेन्ट ब्रिज, नॉटिंघम येथे आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध विंडिज दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध विंडिज दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर, टेविन इम्लाच,जेरेमिया लुईस आणि झॅकरी मॅककास्की.