वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा फलंदाज कावेम हॉज याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकलं आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज यांच्यात ट्रेंट ब्रिज नॉटिंघम येथे हा सामना खेळवण्यात येत आहे. कावेमने विंडिजच्या पहिल्या डावातील 66 व्या ओव्हरमध्ये शतक झळकावलं. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याच्या बॉलिंगवर कावेमने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. कावेमच्या या शतकी खेळीमुळे विंडिजच्या क्रिकेट चाहत्यांना जल्लोष करण्याचं निमित्त मिळालं. कावेमकडून शतकानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला शतकानंतर 20 धावाच करता आल्या. मात्र कावेमने पहिल्याच शतकासह काही विक्रम केले आहेत.
वेस्ट इंडिजे इंग्लंडच्या पहिल्या डावातील 416 धावांच्या प्रत्युत्तरात 84 वर तिसरी विकेट गमावली. कर्क मॅकेन्झी 11 धावावंर बाद झाला. त्यानंतर कावेम हॉज मैदानात आला. कावेमने अलिक अथनाझे याला चांगली साथ दिली. या जोडीने चांगली भागीदारी करत विंडिजला मजबूत स्थितीत आणलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अलिक 82 धावावंर आऊट झाला. अलिकने 99 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. त्यानंतर कावेमने शतक ठोकलं. मात्र त्यानंतर 20 धावा जोडून कावेमने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कावेमची विकेट मिळाल्याने इंग्लंडला दिलासा मिळाला. कावेमने 171 चेंडूत 19 चौकाराच्या मदतीने 120 धावा केल्या.
दरम्यान कावेमने या शतकी खेळीसह काही विक्रम आपल्या नावे केले. कावेम 2017 नंतर इंग्लंडमध्ये शतक करणारा विंडिजचा दुसराच फलंदाज ठरला. त्याआघी क्रेग ब्रेथवेट याने 134 आणि शाई होप याने 147 धावांची खेळी केली होती. दोघांनी ही शतकी खेळी 2017 साली केली होती. तसेच कावेम कॅरेबियाई आणि डोमिनिकाकडून कसोटी शतक झळकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
शतकी खेळीनंतर सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट
The WI dressing room reactions to @kavemHodge22‘s maiden Test ton!💯👏🏿#ENGvWI #MenInMaroon pic.twitter.com/d8C3ALcgGs
— Windies Cricket (@windiescricket) July 19, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.