इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. विंडिज या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात विंडिजवर 1 डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. विंडिजने टॉस जिंकला. कॅप्टन क्रेग ब्रेथवेट याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
इंग्लंड आणि विंडिज दोन्ही संघांनी या सामन्यासाठी काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. जेम्स अँडरसन याने पहिल्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्या जागी अंतिम 11 खेळाडूंमध्ये मार्क वूड याचा समावेश करण्यात आला आहे. तर विंडिजने 17 जुलैला खेळाडूंची नावं जाहीर केली होती. मात्र ऐनवेळेस गुडाकेश मोटी याची तब्येत बिघडल्याने त्याच्या जागी केविन सिंक्लेअर याचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान इंग्लंडचा अनुभवी बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस वोक्स याचा विंडिज विरुद्धचा हा सामना त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 50 सामना ठरलाय. वोक्सने 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. वोक्सने तेव्हापासून ते आतापर्यंत 49 सामन्यात 1 हजार 777 धावा आणि 150 विकेट्स घेतल्या आहेत. वोक्सने या दरम्यान 5 वेळा 5 आणि 1 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत.
विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
Toss Result: WI win the toss & will bowl first in the 2nd Test!💥 #ENGvWI #MenInMaroon pic.twitter.com/hsEYB4hB7m
— Windies Cricket (@windiescricket) July 18, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.