ENG vs WI 3rd Test: विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, इंग्लंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय

| Updated on: Jul 26, 2024 | 4:10 PM

England vs West Indies 3rd Test Toss: इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे विंडिजचा तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी विंडिजची चांगलीच 'कसोटी' लागणार आहे.

ENG vs WI 3rd Test: विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, इंग्लंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय
eng vs wi 3rd test toss
Follow us on

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. क्रेग ब्रेथवेट याच्याकडे विंडिजची धुरा आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करतोय. या तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला आहे. विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. विंडिज कॅप्टन क्रेग ब्रेथवेट याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडने सामन्याच्या काही दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंडच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणताही बदल नाही. कॅप्टन बेन स्टोक्स याने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवत टीम कायम ठेवली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहुण्या विंडिजने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. केविन सिंक्लेअर याच्या जागी गुडाकेश मोटीये याचा समावेश करण्यात आला आहे. केविनला दुखापत झाल्याने त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती कॅप्टन क्रेगने टॉसदरम्यान दिली.

इंग्लंड हॅटट्रिक करणार?

दरम्यान इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने सलामीच्या सामन्यात विंडिजवर मात करत दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याला विजयी निरोप दिला. इंग्लंडने तिसऱ्याच दिवशी विंडिजचा डावाने आणि 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने धुव्वा उडवला. विंडिजने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत विंडिज विरुद्ध जोरदार झुंज दिली. मात्र चौथ्या दिवशी इंग्लंडने विंडिजला ऑलआऊट करत सामन्यासह मालिका जिंकली. त्यामुळे आता इंग्लंडला तिसऱ्या सामन्यासह विंडिजचा व्हाईट वॉश करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडिजचा इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

विंडिजने टॉस जिंकला

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथनाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटीये, शामर जोसेफ आणि जयडेन सील्स.