ENG vs WI: इंग्लंडला मिळाली James Anderson ची रिप्लेसमेंट, दुसऱ्या कसोटीसाठी टीममध्ये समावेश

| Updated on: Jul 15, 2024 | 9:37 PM

England vs West Indies Test Series: यजमान इंग्लंड क्रिकेट टीम विंडिज विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

ENG vs WI: इंग्लंडला मिळाली James Anderson ची रिप्लेसमेंट, दुसऱ्या कसोटीसाठी टीममध्ये समावेश
england cricket team
Image Credit source: AP
Follow us on

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या क्रेग ब्रेथवेट याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यजमान इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामन्यात तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 114 धावांनी दमदार विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 1-0 मालिकेत आघाडी घेतली. तसेच जेम्स अँडरसन याला विजयासह निरोप दिला. जेम्स अँडरसनने विंडिज विरुद्धचा लॉर्ड्समधील पहिला सामना हा अखेरचा असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. अँडरसनच्या निवृत्तीनंतर सुवर्ण युगाचा अंत झाला.

जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीनंतर आता इंग्लंड टीममध्ये वेगवान गोलंदाज मार्क वूड याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता मार्क याचा दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा ट्रेंट ब्रिज नॉटिंघम येथे 18 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

मार्क वूडची कसोटी कारकीर्द

दरम्यान मार्क वूड याने इंग्लंडचं 34 कसोटी सामन्यांमध्ये 108 विकेट्स घेतल्या आहेत. वूडची एका डावात 37 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच वूडने एका कसोटी सामन्यात 100 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. वूडने विंडिज विरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 84 धावा खर्चून 3 विकेट्स मिळवल्या आहेत.

पहिल्या सामन्याचा धावता आढावा

दरम्यान उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा पूर्णपणे एकतर्फी राहिला. इंग्लंडने टॉस जिंकून विंडिजला 121 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 371 धावा केल्या. त्यानंतर विंडिजचा दुसरा डाव हा 136 धावांवर आटोपला.

इंग्लंड टीममध्ये दुसऱ्या कसोटीसाठी वूडचा समावेश

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर, टेविन इम्लाच,जेरेमिया लुईस आणि झॅकरी मॅककास्की.

टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम: बेन स्टोक्स (कॅप्टन), गस एटकिंसन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेंस, डिलन पेनिंगटन, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.