मुंबई : यंदा भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये अपात्र ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडचा पराभव केला आहे. इग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्य पहिल्या वन डे सामन्यामध्ये वर्ल्ड कप विनर इंग्लंडला पराभूत केलं. शेवटच्या दोन ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात इंडिजचा कर्णधार शाई होपने षटकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 325 धावांचा पाठलाग वेस्ट इंडिज संघाने 49 ओव्हरमध्ये आव्हान पूर्ण केलं. या सामन्यानंतर बोलताना शाई होप याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सांगितलेल्या गोष्टीचा फायदा झाल्याचं सांगितलं.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करतान वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथानाझेने 66 धावांची खेळी करत चांगली सुरूवात केली होती. त्यानंतर शाई होपने नाबाद 109 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि चार चौकार मारले. त्यासोबतच रोमॅरियो शेफर्डने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 49 धावांची महत्त्वाची खेळी केली.
काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनीची भेट झाली होती, त्यावेळी धोनीने मला सांगितलं होतं की, तुम्ही मैदानात असताना तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असतो. ही गोष्ट डोक्यात एकदम फिट झाल्याचं शाई होपने सांगितलं. शाई होपने या शतकासह वन डे मधील आपल्या 16 व्या शतकाला गवसणी घातली.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रॅंडन किंग, अॅलिक अथानाझे, केसी कार्टी, शाई होप (C/W), शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओशाने थॉमस
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (C/W), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन