वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजवर तिसर्याच दिवशी 1 डाव आणि 114 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह मालिकेत1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तसेच दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याचा हा अखेरचा कसोटी आणि आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंडने अँडरसनलाही विजयी निरोप दिला. त्यानंतर आता मालिकेतील दुसर्या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव आणि अपेक्षित बदल केला आहे. मार्क वूड याचा जेम्स अँडरसन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. जेम्सच्या निवृत्तीनंतर दुसऱ्या कसोटीसाठी मार्क वूड याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आता वूडला प्लेइंग ईलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा नॉटिंघम, ट्रेन्ट ब्रिज येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सामना गुरुवार 18 ते सोमवार 22 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर क्रेग ब्रेथवेट याच्याकडे विंडिजची सूत्रं आहेत.
दरम्यान पहिल्या सामन्यात इंग्लंडने टस जिंकून विंडिजला पहिल्या डावात झटपट गुंडाळलं. विंडिजचा पहिला डाव हा 121 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 371 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 250 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर विंडिजला दुसऱ्या डावात 250 धावांच्या प्रत्युत्तरात 136 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशाप्रकारे इंग्लंडने तिसऱ्याच दिवशी विंडिजचा 1 डाव आणि 114 धावांनी धुव्वा उडवला.
मार्क वुडला दुसऱ्या कसोटीसाठी संधी
We’ve made one change from Lord’s 👇
— England Cricket (@englandcricket) July 16, 2024
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर, टेविन इम्लाच,जेरेमिया लुईस आणि झॅकरी मॅककास्की.