वेस्ट इंडिज क्रिकेट टीम क्रेग ब्रॅथवेट याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा 18 जुलैपासून सुरु होणार आहे. सामन्याआधीच दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे इंग्लंड-विंडिज या सामन्यासाठी सज्ज आहे. त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर निवृत्ती घेतली. मात्र त्यानंतरही जेम्स अँडरसन इंग्लंड टीमसोबत आहे. जेम्सला निवृ्तीनंतर मोठी जबाबदारी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जेम्सला निवृत्तीच्या 4 दिवसांनंतरच मोठी गूड न्यूज मिळाली आहे. जेम्स आता इंग्लंडसाठी नव्या भूमिकेत दिसणार आहे.
जेम्स आता इंग्लंडसाठी कसोटी मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये मेंटॉर म्हणून असणार आहे. जेम्स या मालिकेनंतर या भूमिकेत असणार की नाही? याबाबत कोणतीही माहिती नाही. दुसरा कसोटी सामना हा ट्रेन्ट ब्रिज, नॉटिंघम येथे होणार आहे. जेम्स 2 सामन्यांसाठी मेंटॉर म्हणून असल्याने त्याच्या अनुभवाचा फायदा हा टीमला होणार, हे निश्चित होणार आहे.
दरम्यान जेम्स अँडरसन याने कसोटीआधी वनडे आणि टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. जेम्सने कसोटी कारकीर्दीत एकूण 704 विकेट्स घेतल्या. जेम्सचा लॉर्ड्सवरील विंडिज विरूद्धच्या पहिला सामना हा शेवटचा होता. जेम्सने या अखेरच्या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. जेम्सने कसोटीमध्ये 704, वनडेत 269 आणि टी 20 मध्ये 18 विकेट्स घेतल्या.
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.