ENG vs WI : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कर्णधार लियाम लिविंगस्टोनने घेतला असा निर्णय

| Updated on: Nov 02, 2024 | 8:01 PM

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या सामन्यातील दुसरा सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात काहीही करून इंग्लंडला कमबॅक करावं लागेल.

ENG vs WI : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कर्णधार लियाम लिविंगस्टोनने घेतला असा निर्णय
Image Credit source: Twitter
Follow us on

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दुसरा सामना निर्णायक ठरणार आहे. वेस्ट इंडिजला मालिका जिंकण्यासाठी आणि इंग्लंडला मालिकेत कमबॅकसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार लियाम लिविंगस्टोनने सांगितलं की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. आशा आहे की खेळपट्टीवर थोडा ओलावा असेल. आशा आहे की इतर दिवसांप्रमाणेच, जोफ्रा आणि जेटी (जॉन टर्नर) यांनी चांगली गोलंदाजी केली, आशा आहे की सामन्याच्या मध्यात खेळपट्टी काही फिरकीला मदत करेल. साकिब महमूद जेमी ओव्हरटनऐवजी खेळणार आहे.’

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने सांगितलं की, “आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे, ही एक वेगळी खेळपट्टी आहे. परिस्थितीचे त्वरीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अलझारी बाहेर असून संघात शामर जोसेफला घेतलं आहे. आपल्या पुढे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्हाला वाटले की आम्ही खूप जास्त शिस्तबद्ध आहोत. आम्हाला गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.” हा सामना इंग्लंडच्या पारड्यात गेला तर तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने 209 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे 35 षटकात 157 धावांचं आव्हान करण्यात आलं. हे आव्हान वेस्ट इंडिजने 2 गडी गमवून 25.5 षटकात पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, गुडाकेश मोटी, मॅथ्यू फोर्ड, जेडेन सील्स, शामर जोसेफ.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन (कर्णधार), सॅम करन, डॅन मौसले, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, जॉन टर्नर