इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली. आता त्यानंतर इंग्लंड पुढील महिन्यात अर्थात ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्स याचं दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्टोक्स नेतृत्वाची सूत्रं हातात घेणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे स्टोक्सला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं. त्यामुळे ओली पोप याने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच स्टोक्सह रेहान आणि जॅक लीच यांचं पुनरागमन झालं आहे.
जॅक लीच जानेवारी 2024 नंतर इंग्लंड संघात परतला आहे. जॅक लीचने जानेवारी 2024 मध्ये टीम इंडिया विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. दुसर्या बाजूला रेहान अहमद याने 2022 साली पाकिस्तान विरुद्ध कराची येथे पदार्पण केलं होतं. रेहानने तेव्हापासून 4 कसोटी सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या. तर शोएब बशीर या दोघांना तिसरा स्पिनर म्हणून साथ देईल. तर टॉम हार्टली याला संधी मिळालेली नाही.
पाकिस्तान विरुद्ध एकूण 6 जणांवर बॅटिंगची जबाबदारी असणार आहे. यामध्ये सहा जणांमध्ये कॅप्टन बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रुट आणि जेमी स्मिथ यांचा समावेश आहे. जो रुट याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. रुटने 3 सामन्यांमध्ये 375 धावा केल्या. रुटला या कामगिरीसाठी मालिकावीर या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ
📝 Our 17-strong squad to take on Pakistan! 🏏
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
पहिला सामना, 7-11 ऑक्टोबर, मुल्तान
दुसरा सामना, 15-19 ऑक्टोबर, कराची
तिसरा सामना, 24-28 ऑक्टोबर, रावळपिंडी
पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, गस एटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ओली स्टोन आणि क्रिस वोक्स.