राजकोट | इंडिया इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. तिसरा कसोटी सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका रंगतदार स्थितीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा तिसरा सामना जिंकून मालिकेवर घट्ट पकड मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. शोएब बशीर याला बाहेरचा रस्ता दाखवून मार्क वूड याला संधी देण्यात आली आहे. शोएब बशीर याने विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. मात्र शोएबला आपली छाप सोडता आली नाही. पण टीम मॅनेजमेंटने पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मार्क वूड याला दुसऱ्या सामन्यातील डच्चूनंतर तिसऱ्या मॅचमध्ये संधी दिलीय. त्यामुळे इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी 2 पेसर आणि 3 स्पिनरसह मैदानात उतरेल. मार्क वूड आणि जेम्स एंडरसन या दोघांवर वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे. तर रेहान अहमद, जो रुट आणि टॉम हार्टली या त्रिकुटावर फिरकीची मदार असेल.
शोएब बशीर याने पदार्पणातच 4 विकेट्स घेतल्या. शोएबने समाधनकारक कामगिरी केली. मात्र क्रिकेट तज्ञांनुसार त्याला लय सापडली नाही. शोएबने एकूण 38 ओव्हर टाकल्या. शोएबने या 38 पैकी 1 ओव्हर मेडन टाकली. शोएबने पदार्पणातच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याची विकेट घेतली.
तिसऱ्या टेस्टसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन जाहीर
England announce their playing XI for the Rajkot Test 👀
— ICC (@ICC) February 14, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).