इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर इंग्लंड आपल्या घरात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिकेत 3 सामने होणार आहेत. तर वनडे सीरिजमध्ये 5 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. मात्र इंग्लंडला या टी 20i मालिकेआधी मोठा झटका लागला आहे.
इंग्लंडचा नियमित कर्णधार जॉस बटलर याला दुखापतीमुळे टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. बटलरच्या जागी जेमी ओवरटन याचा समावेश करण्यात आला आहे. या टी 20i मालिकेला 11 सप्टेंबरपासून साउथम्पटन येथे सुरुवात होणार आहे. तसेच बटलरच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा फिल सॉल्ट हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टी 20i मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. जॉस बटलर या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर जॉर्डन कॉक्स याला कवर खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला आहे.
इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i सीरिजसाठी इंग्लंड टीम : फिल सॉल्ट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॅकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, साकिब महमूद, डॅन माउस्ली, जॅमी ओवर्टन, आदिल राशिद, रीसे टॉपली आणि जॉन टर्नर.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकीन्सन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, फिल साल्ट, जेमी स्मिथ, रीसे टॉप्ले आणि जॉन टर्नर.