Test Cricket: वर्ल्ड कप संपताच टीमची घोषणा, कसोटी मालिकेसाठी कुणाला संधी?

| Updated on: Jun 30, 2024 | 5:59 PM

Test Cricket: कसोटी मालिकेतील 3 पैकी पहिल्या 2 सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाहा कॅप्टन कोण आणि कुणाला मिळाली संधी?

Test Cricket: वर्ल्ड कप संपताच टीमची घोषणा, कसोटी मालिकेसाठी कुणाला संधी?
ind vs eng ben stokes test cricket
Image Credit source: BCCI
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची अखेर सांगता झाली. टीम इंडियाने महाअंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र त्यांना 169 धावांवरच रोखलं. अशाप्रकारे थरारक सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आणि भारतीय चाहत्यांची 13 वर्षांपासूनची आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. या स्पर्धेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत करत मागचापुढचा सर्व हिशोब बरोबर केला. टीम इंडियाने कांगारुंना सुपर 8 मध्ये पराभूत करत वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचा वचपा काढला. तर इंग्लंडला धुळ चारत सेमी फायनमधून बाहेर केलं आणि 2022 उंपात्य फेरीतील हिशोब क्लिअर केला. गतविजेता इंग्लंड आता टी 20 वर्ल्ड कपनंतर विंडिज विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. विंडिज इंग्लंड दौरा करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.

इसीबीने पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इसीबीने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बेन स्टोक्स हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर देशांतर्गत स्पर्धेत उल्लेखनीय करणाऱ्या 2 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. कसोटी मालिकेचं आयोजन हे 10 ते 30 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग असणार आहे.

वेगवान गोलंदाज डिलन पेनिंग्टन आणि विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथ या दोघांची पहिल्यांदाच टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर ख्रिस वोक्सचं 1 वर्षांनंतर टीममध्ये कमबॅक होणार आहे. वोक्सने अखेरचा सामना जुलै 2023 मध् खेळला होता. वोक्सने तेव्हा एशेस या प्रतिष्ठेच्या मालिकेत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरला होता. तसेच ऑफ-स्पिनर शोएब बशीर हा मुख्य फिरकी गोलंदाज असणार आहे.

जेम्स अँडरसनचा शेवटचा सामना

दरम्यान इंग्लंडचा दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनचा या मालकेतील पहिला सामना हा त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा असणार आहे. अँडरसन या सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. अँडरसनने याबाबतची माहिती काही महिन्यांपूर्वीच दिली होती. पहिला सामना हा 10 जुलैपासून होणार क्रिकेट पंढरी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा अँडरसनला विजयी निरोप देण्याचा मानस असणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स

दुसरा सामना – 18 ते 22 जुलै, नॉटिंगघम

तिसरा सामना – 26 ते 30 जुलै, बर्मिंगघम

इंग्लंड क्रिकेट टीम: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन (पहिल्या सामन्यानंतर निवृत्त) , गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, डिलन पेनिंग्टन, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ आणि ख्रिस वोक्स.

विंडिज टीम: क्रॅग ब्रॅथवेट (कॅप्टन), एलिक अथानाजे, जोशुआ दा सिल्वा, जेसन होल्डर, कावेम हॉज, टेविन इमलाच, अल्जारी जोसेफ (उपकर्णधार), शामर जोसेफ, मिकाइल लुइस, जाचरी मॅकास्की, किर्क मॅकेंजी, गुडाकेश मोती, केमार रोच, जेडन सील्स आणि केविन सिंक्लेयर.