मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला अवघे काही दिवस बाकी असून सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाचा कप हा भारतात असल्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपसाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केलीये. आता जाहीर केलेल्या संघामध्ये 28 सप्टेंबरपर्यंत बदल करता येणार आहे. टीम इंडियाचीसुद्धा घोषणा झाली असून रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. मात्र अशातच गतविजेत्या वर्ल्ड कप संघाचा कर्णधार आता बदलला गेला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूवर जबाबदारी सोपवली आहे.
वर्ल्ड कप आधी इंग्लंडने वन डे मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. त्यांच्या जागी तीन युवा खेळाडूंना संधी दिली आहे. युवा खेळाडू जॅक क्रॉलीकडे याच्याकड कर्णधारपद सोपवलं आहे. वर्ल्ड कपआधी इंग्लंडची आयर्लंडविरूद्ध् तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलीये.
आयर्लंड संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या संघामध्ये तीन अनकॅप खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. म हेन, यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथ आणि जॉर्ज स्क्रिमशॉ अशी अनकॅप खेळाडूंची नावं आहेत. 20 सप्टेंबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी वर्ल्ड कपबाबत काही भविष्यावाणी केल्या आहेत. यामधील एक म्हणजे सेमी फायनलमधे जाणाऱ्या सघांमध्ये इंग्लंडचा समावेश असणार आहे. अशीही भविष्यवाणी एकाने केलीये. कारण तशा प्रकारचे तगडे खेळाडू इंग्लंड संघामध्ये आहेत. यातील काहींनी तर अनेक सामने एकट्याच्या जिवावर जिंकून दिलेत.
झॅक क्रॉली (कर्णधार), हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से, बेन डकेट (उप-कर्णधार), सॅम हेन, विल जॅक, रिहान अहमद, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, फिल सॉल्ट, ल्यूक वुड, जॉर्ज स्क्रिमशॉ आणि जेमी स्मिथ.