Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याच्या झंझावातासमोर समरसेटची झुंज अपयशी, नॉर्थहॅम्प्टनशायरचा 87 धावांनी विजय

| Updated on: Aug 10, 2023 | 4:06 PM

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ हा नॉर्थहॅम्प्टनशायर क्रिकेट टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पृथ्वीने समरसेट विरुद्ध द्विशतकी खेळी केली.

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याच्या झंझावातासमोर समरसेटची झुंज अपयशी, नॉर्थहॅम्प्टनशायरचा 87 धावांनी विजय
Follow us on

लंडन | पृथ्वी शॉ याच्या खणखणीत द्विशतकीय खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने समरसेटवर 87 धावांनी विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉ याने केलेल्या 244 धावांच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने समरसेटला विजयासाठी 416 धावांचं आव्हान दिलं होतं. समरसेटने 416 रन्सचं टार्गेटचं पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र डोंगराएवढ्या आव्हानासमोर समरसेटचे प्रयत्न अपुरे पडले. समरसेटचा बाजार 45.1 ओव्हरमध्ये 328 धावांवरच आटोपला. समरसेटकडून एंड्रयू उमीद याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तर कॅप्टन सीन डिकसनने 52 धावांचं योगदान दिलं.

उमीद आणि डिकसन या दोघांशिवाय इतरांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. नॉर्थहॅम्प्टनशायरकडून रॉब केओघ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर टॉम टेलर याने 3 जणांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लुक प्रॉक्टर याने 2 जणांचा काटा काढला. तर सायमन केरिगन याच्या खात्यात 1 विकेट घेतली.

हे सुद्धा वाचा

नॉर्थहॅम्प्टनशायर टीमचा विजय


त्याआधी नॉर्थहॅम्प्टनशायरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून पृथ्वी शॉ सपशेल अपयशी ठरला. इंग्लंडलमधील या डोमेस्टिक वनडे कपमधील पदार्पणातील सामन्यातही पृथ्वी हिट विकेट आऊट झाला. मात्र पृथ्वीने समरसेट विरुद्धच्या सामन्यात आपण काय आहोत, हे दाखवून दिलं.

ओपनिंगला आलेल्या पृथ्वीने 49.3 ओव्हरपर्यंत टिकून राहून जोरदार प्रहार केला. पृथ्वीने 153 बॉलमध्ये 28 फोर आणि 11 गगनचुंबी सिक्स ठोकत 244 धावा ठोकल्या. तर सॅम व्हाइटमन याने 54, रिकार्डो वास्कोनसेलोस याने 47 धावा केल्या. तर एमिलियो गे 30 आणि टॉम टेलर 10 धावा करुन माघारी परतले. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन लुईस मॅकमॅनस 2 रन्स करुन आऊट झाला.

नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेईंग इलेव्हन | लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, रिकार्डो वास्कोनसेलोस, सॅम व्हाइटमन, ल्यूक प्रॉक्टर, रॉब केओघ, टॉम टेलर, जस्टिन ब्रॉड, सायमन केरिगन आणि जॅक व्हाईट.

समरसेट प्लेईंग इलेव्हन | जॉर्ज थॉमस, अँड्रयू उमेद, लुईस गोल्डस्वर्थी, जेम्स रिव, शॉन डिक्सन, जॉर्ज बार्टलेट, कर्टिस कॅम्फर, डॅनी लॅम्ब, नेड लिओनार्ड, जॅक ब्रूक्स आणि शोएब बशीर.