धर्मशाला | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील धर्मशालेत होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी आता काही तासांचा कालावधी बाकी आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना हा 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया या मालिकेत विजयी चौकारासाठी सज्ज आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. दोन्ही संघांनी पाचव्या सामन्यासाठी कंबर कसली आहे.
इंग्लंडने या पाचव्या सामन्यासाठी एक दिवसआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करत आपण तयार असल्याची गर्जना केली आहे. इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. इंग्लंडने हा बदल बॉलिंगमध्ये केला आहे. पाचव्या सामन्यासाठी मार्क वूड याची इंग्लंडमध्ये एन्ट्री झाली आहे. तर ओली रॉबिन्सन याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रॉबिन्सन याला रांचीत झालेल्या टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. रॉबिन्सनने चौथ्या कसोटीत इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली होती.
रॉबिन्सनने रांचीत नवव्या क्रमांकावर बॅटिंग करताना 58 धावांची खेळी केली. रॉबिन्सनने ओली पोप याच्यासोबत भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला होता. मात्र त्यानंतरही पाचव्या सामन्यातून इंग्लंड टीमने ओली रॉबिन्सनने प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मार्क वूड याने टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. वूडने या 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र इंग्लंडसाठी ही फारशी चांगली कामगिरी नाही. त्यानंतरही वूडला संधी मिळाली आहे. कारण त्याच्या जागी ओली रॉबिन्सनला रांची कसोटीत संधी देण्यात आली, मात्र त्याला त्याचा फायदा घेता आला नाही.
इंग्लंडकडून प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल
England ring in one change for the fifth and final Test against India in Dharamsala 🗒#WTC25 | #INDvENG | More 👇https://t.co/mtR3vzJ6lL
— ICC (@ICC) March 6, 2024
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.