मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन 12 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने 7 ऑगस्ट रोजी 18 सदस्यीय प्रिलिमिनरी स्क्वॉड जाहीर केला होता. या 18 खेळाडूंमधून 15 जण वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंड टीमने प्रिलिमिनरी स्क्वॉड घोषणा केली आहे. इंग्लंडने 15 खेळाडूंचा प्रिलिमिनरी स्क्वॉड घोषित केला आहे.
इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री केली आहे. स्टोक्सने जुलै 2022 मध्ये अखेरचा सामना खेळल्यानंतर वनडे क्रिकेटला रामराम केला होता. मात्र स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेत कमबॅक केलं आहे. इंग्लंड वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. स्टोक्स न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे.
तसेच इंग्लंडने हॅरी ब्रूक याला संधी दिलेली नाही. तसेच अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चर याचाही समावेश करण्यात आलेला नाही. आर्चरचा कदाचित राखीव खेळाडू म्हणून समावेश केला जाऊ शकतो, असं टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं आहे.
वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम
🚨 BREAKING: England have named their provisional 15-member squad for the @cricketworldcup 2023, with a few surprise selections 📝
Details 👇https://t.co/R8OaRRnZu8
— ICC (@ICC) August 16, 2023
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी इंग्लंड प्रिलिमिनरी स्क्वॉड | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
दरम्यान इंग्लंड टीम न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टी 20 सीरिजला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. तर त्यानंतर 4 सामन्यांचीच एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. वर्ल्ड कपआधी इंग्लंडसाठी ही महत्वाची मालिका असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंग्लंड | जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स,
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), रेहान अहमद, मोइन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जोश टोंग, जॉन टर्नर आणि ल्यूक वुड.