T20 World Cup 2024 : बेन स्टोक्सचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय, टीमला मोठा झटका

| Updated on: Apr 02, 2024 | 3:57 PM

Icc T20I World Cup 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार सुरु असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार खेळाडूने आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधून माघार घेतल्याचं जाहीर केलंय.

T20 World Cup 2024 : बेन स्टोक्सचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय, टीमला मोठा झटका
ben stokes k l rahul and virat kohli,
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या थराराला सुरुवात होणार आहे. आयसीसीने या टी 20 वर्ल्ड कपसाठी आधीच वेळापत्रक जाहीर केलंय. स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि विंडिजमध्ये करण्यात आलं आहे. 1 ते 29 जून दरम्यान स्पर्धा पार पडणार आहे. एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या 2 महिन्यांआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. या टी 20 वर्ल्ड कपमधून एका स्टार खेळाडूने माघार घेतली आहे.

इंग्लंडचा विस्फोटक ऑलराउंडर बेन स्टोक्स याने टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मी वर्ल्ड कपसाठी माझी निवड होईल, असा विचार करत नाही, असं स्टोक्सने म्हटलंय. बेन स्टोक्स हा इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार आहे. बेन स्टोक्स याचं आता बॉलिंगकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी पूर्णपणे फिट होण्याकडे आहे. बेन स्टोक्स भारत दौऱ्यातही फक्त फलंदाज म्हणून खेळला होता.

बेन स्टोक्स काय म्हणाला?

“मी कठोर परिश्रम करत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम ऑलराउंडर होण्यासाठी बॉलिंग आणखी मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे. आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय बलिदान आहे, ज्यामुळे मला भविष्यात ऑलराउंडर होण्यासाठी मदतशीर ठरेल”, असं स्टोक्स म्हणाला.

बेन स्टोक्सचा वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय

बेन स्टोक्स याची टी 20 कारकीर्द

बेन स्टोक्स याने आतापर्यंत इंग्लंडचं 43 टी 20 सामन्यांमध्ये 21.67 च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. स्टोक्सने त्याच्या टी 20 कारकीर्दीत 1 अर्धशतक ठोकलंय. तसेच स्टोक्सने 26 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने 2022 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामध्ये बेन स्टोक्स याने निर्णायक भूमिका बजावली होती.

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन

दरम्यान रोहित शर्मा हा टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली होती.