World Cup मधून बाहेर पडल्यावर इंग्लंड संघातून 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता, दिग्गजांचाही समावेश

| Updated on: Nov 12, 2023 | 3:58 PM

World Cup 2023 : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप संघामधील तब्बल नऊ खेळाडूंना बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नेमके कोण आहेत ते खेळाडी एकदा जाणून घ्या.

World Cup मधून बाहेर पडल्यावर इंग्लंड संघातून 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता, दिग्गजांचाही समावेश
Follow us on

मुंबई :  वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये चार संघांनी प्रवेश केला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गतविजेता इग्लंड संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही. इंग्लंड संघाने नऊ सामन्यांमध्ये अवघे तीन सामने जिंकले त्यासाठीसुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. या खराब कामगिरीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून संघात तगडे बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघात दोन तीन नाहीतर तब्बल नऊ बदल केले आहेत. वन डे संघातील नऊ खेळाडूंना बसवलं आहे.

या खेळाडूंना बाहेरचा रस्ता

वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघामधील सहा खेळाडूंना वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात कायम ठेवलं आहे. संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये कप्तान बटलर, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंग्स्टन, गस एटिंग्सन, ब्रेडन कार्स यांना कायम ठेवलं आहे. जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, जो रूट, मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, आदिल रशीद, रीस टोप या खेळाडूंना बाहेर समावेश आहे.

संघात नव्या चेहऱ्यांना संधी

लेगस्पिनर रेहान अहमद, जॅक क्रोली, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक, ऑली पोप, फिल सॉल्ट यांना वन डे संघात स्थान मिळालं आहे. तर रेहान, डकेट, विल जॅक, फिल सॉल्ट, टॉंग, टर्नर यांना टी-20 संघात एन्ट्री मिळाली आहे. तर वन डे संघामधील मोईन अली, आदिल रशीद, वोक्स आणि टोपली यांना टी-20 संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

 

इंग्लंड एकदिवसीय संघ: जोस बटलर (C), रेहान अहमद, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कर्स, जॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिव्हिंग्स्टन, ऑली पोप, फिल सॉल्ट, जोश टंग, जॉन टर्नर

इंग्लंडचा टी-20 संघ: जोस बटलर (C), रेहान अहमद, मोईन अली, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंग्स्टन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, रीस टोपले, जॉन टर्नर, ख्रिस वोक्स.