ENG vs AUS : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना टीव्ही-मोबाईलवर इथे पाहा, जाणून घ्या

| Updated on: Sep 27, 2024 | 12:41 AM

England vs Australia 4th Odi Live Streaming: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथा सामना हा निर्णायक असा असणार आहे.

ENG vs AUS : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना टीव्ही-मोबाईलवर इथे पाहा, जाणून घ्या
england vs australia odi
Image Credit source: England Cricket X Account
Follow us on

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सलग 2 सामने जिंकून 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर करो या मरो सामन्यात मात करत मालिकेतील आव्हान कायम राखलं. आता दोन्ही संघ चौथा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी चौथा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता इंग्लंड ऑस्ट्रेलियाला चौथ्या सामन्यात जिंकण्यापासून रोखणार का? याकडे साऱ्याचंच लक्ष आहे. हा सामना केव्हा आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना केव्हा?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना शुक्रवारी 27 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना कुठे?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर येथे खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया चौथा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

कोण जिंकणार चौथा सामना?

इंग्लंड क्रिकेट टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, रीस टोपले, साकिब महमूद, जॉर्डन कॉक्स, जॉन टर्नर आणि ऑली स्टोन.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, ॲडम झाम्पा, बेन ड्वार्शुस, जोश इंग्लिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि कूपर कॉनोली.