अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 4 नोव्हेंबरला डबल हेडरमधील दुसरा सामना हा 2 कडवट प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील हा 36 वा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व हे पॅट कमिन्स याच्याकडे आहे. तर इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी जॉस बटलर याच्याकडे आहे. इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यात जमा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे कांगारुंना हा सामना जिंकावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन खेळ बिघडवू शकते. हा सामना कधी कुठे आणि केव्हा पाहता येईल हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना हा अहमदाबमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 3 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर फ्री पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर डाऊनलोड करावा लागेल.
इंग्लंड क्रिकेट टीम | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड, सॅम कुरन, हॅरी ब्रूक, गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कारसे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवूड, मार्कस स्टॉइनिस, एलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्री आणि, शॉन अॅबॉट.