आयपीएलचा 17 वा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. साखळी फेरीनंतर आता प्लेऑफचा थरार सुरु आहे. यानंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी 20 मालिका होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने महत्त्वाची असणार आहे. पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या मालिकेतील कामगिरीच्या आधारावरच पाकिस्तान निवड समिती वर्ल्ड कप संघात कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही, हे ठरवेल.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेला 22 मे पासून सुरुवात होणार आहे. तर अखेरचा सामना हा 30 मे रोजी होणार आहे. एकूण 4 सामने उभयसंघात होणार आहेत. जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. तर बाबर आझम पाकिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे. दरम्यान इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेऊयात. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील सामने हे भारतात सोनी टीव्ही नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर सामने पाहायला मिळतील. मात्र त्याच्यासाठी सब्सक्रिपशन बंधनकारक असणार आहे.
पहिला सामना, 22 मे, रात्री 11 वाजता, लीड्स.
दुसरा सामना, 25 मे, संध्याकाळी 7 वाजता, बर्मिंगघम.
तिसरा सामना, 28 मे, रात्री 11 वाजता, कार्डिफ.
चौथा सामना, 30 मे, रात्री 11 वाजता, लंडन.
पाकिस्तान क्रिकेट टीम : बाबर आजम (कॅप्टन), सैम अयूब, मोहम्मद रिजवान, फखर जमान, आजम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन अफरीदी, नसीम शाह, अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, शादाब खान, उस्मान खान, हसन अली, हारिस रऊफ, आगा सलमान, अबरार अहमद आणि इरफान खान.
इंग्लंड क्रिकेट टीम : जोस बटलर (विकेटकीपर आणि कॅप्टन), फिल साल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक और बेन डकेट, मोईन अली, लियम लिविंग्सटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, क्रिस जोर्डन, रीस टॉपली, मार्क वुड, आदिल रशीद आणि टॉम हार्टले.