IPL 2023 | आयपीएल दरम्यान ऑलराउंडर खेळाडूची निवृत्ती, क्रिकेट चाहत्यांना धक्का

| Updated on: May 05, 2023 | 7:07 PM

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 16 व्या पर्वादरम्यान ऑलराउंडर खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 | आयपीएल दरम्यान ऑलराउंडर खेळाडूची निवृत्ती, क्रिकेट चाहत्यांना धक्का
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना एकसेएक थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. या सिजनमध्ये आतापर्यंत एकही सुपर ओव्हर झालेली नाही, मात्र अनेक सामन्यांचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागला आहे. या पर्वात आतापर्यंत एकूण 47 सामने खेळवण्यात आले आहेत. आता रायव्हलरी वीक सुरु झाल्याने प्रत्येक संघात प्लेऑफ क्वालिफाय होण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. पॉइंट्सटेबलमध्ये 12 ते 10 गुणांसह ट्राफिक जॅम पाहायला मिळत आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

स्टार ऑलराउंडरने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. इंग्लंडची महिला क्रिकेट टीमची ऑलराउंडर कॅथरीन सायवर ब्रंट हीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कॅथरीने हीने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटलाही रामराम केला होता. मात्र आता कॅथरीनने 19 वर्षांच्या दीर्घ क्रिकेट कारकीर्दीनंतर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने 2009 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. कॅथरीन या वर्ल्ड कप विनर टीमची सदस्य होती. विशेष बाब म्हणजे कॅथरीन हीला 2009 वर्ल्ड कप फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

कॅथरीन सायवर ब्रंट हीची प्रतिक्रिया

“आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवासात मी शेवटच्या टप्प्यावर आहे.मी कधी या निर्णयापर्यंत पोहचेन असं वाटलं नव्हतं. निवृत्तीचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील आव्हानात्मक निर्णयांपैकी क्षणांपैकी एक आहे. मी कायमच माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी इंग्लंडसाठी दीर्घकाळ खेळू शकले, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. माझ्या इथवरच्या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांची मी आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया कॅथरीन सायवर ब्रंट हीने दिली.

कॅथरीन सायवर ब्रंट हीचा क्रिकेटला रामराम

कॅथरीन सायवर ब्रंट आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कॅथरीन सायवर ब्रंट ही इंग्लंडच्या यशस्वी ऑलराउंडरपैकी एक होती. कॅथरीन सायवर ब्रंट हीने इंग्लंडचं 14 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये तिने 184 धावा केल्या आहेत आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत. तर 141 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 90 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत 170 विकेट्स आहेत.

तसेच कॅथरीन सायवर ब्रंट हीने 112 टी 20 सामन्यांमध्ये 114 विकेट्स घेतल्या आहेत आणि 590 केल्या आहेत. कॅथरीन सायवर ब्रंट ही दक्षिण आफ्रिकेत या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपची भाग होती.