IND vs ENG | इंग्लंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून ‘या’ युवा खेळाडूचं पदार्पण

| Updated on: Feb 23, 2024 | 9:40 AM

India vs England 4th Test Toss Update | टीम इंडिया या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे.

IND vs ENG | इंग्लंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून या युवा खेळाडूचं पदार्पण
Follow us on

रांची | इंग्लंड क्रिकेट टीमने टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या आणि करो या मरो कसोटी सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन बेन स्टोक्स याने टीम इंडिया विरुद्ध पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने या चौथ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. तर टीम इंडियामध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह याला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी आकाश दीप या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.

इंग्लंडमध्ये 2 बदल

इंग्लंडने या मालिकेतील पहिल्या सामन्यात हैदराबादमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. मात्र टीम इंडियाने त्यानंतर सलग 2 सामने जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे आता इंग्लंडला मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा किंवा बरोबरीत सोडवावा लागणार आहे. त्यासाठी इंग्लंडने 24 तासांआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करत 2 बदल केले.

हे सुद्धा वाचा

इंग्लंडने खेळपट्टी पाहून 2 बदल केले आहेत. मार्क वूड आणि रेहान अहमद या दोघांना प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. तर ओली रॉबिन्सन आणि शोएब बशीर या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. आता इंग्लंडचा या सामन्यात पहिल्या डावात मोठी धावसंख्या करुन टीम इंडियावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आकाश दीप याचं पदार्पण

दरम्यान आकाश दीप हा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणारा चौथा तर एकूण 313 वा भारतीय ठरला आहे. आकाश दीप याच्या आधी टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्धच्या सुरु मालिकेत रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या तिघांनी पदार्पण केलं होतं.

इंग्लंडने टॉस जिंकला

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.