ENG vs NED Toss | नेदरलँड्स विरुद्ध इंग्लंडने टॉस जिंकला, पहिले बॅटिंगचा निर्णय

| Updated on: Nov 08, 2023 | 4:09 PM

England vs Netherlands Toss | इंग्लंड क्रिकेट टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून नेदरलँड्स टीमला फिल्डिंगसाठी भाग पाडलंय.

ENG vs NED Toss | नेदरलँड्स विरुद्ध इंग्लंडने टॉस जिंकला, पहिले बॅटिंगचा निर्णय
Follow us on

पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 40 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. कॅप्टन जॉस बटलर याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आता नेदरलँड्सचे गोलंदाज इंग्लंडला किती धावांपर्यंत रोखतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही टीममध्ये बदल

इंग्लंड आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. नेदरलँड्सने 1 तर इंग्लंडने 2 बदल केलेत. साकिब झुलफिकार याच्या जागी टीममध्ये तेजा निदामनारु याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर जॉस बटलर याने इंग्लंड प्लेईंग ईलेव्हनमधून मार्क वूड आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर त्याजागी हॅरी ब्रूक आणि गॅरी ऍटकिन्सन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडसाठी हा वर्ल्ड कप एका वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. इंग्लंड टीमने या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. तर नेदरलँड्सने उल्लेखनीय कामगिरी करत आपली दखल क्रिकेट विश्वाला घ्यायाला भाग पाडलं. नेदरलँड्स आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप 2023 मधील आठवा सामना आहे. नेदरलँड्सने 7 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर 5 वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश लोळवलं. तर इंग्लंडला अजून फक्त 1 सामनाच जिंकता आला. नेदरलँड्स पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि इंग्लंड दहाव्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडने टॉस जिंकला

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.