अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत आज शनिवारी 2 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 35 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. तर 36 व्या मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन जॉस बटलर याने फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कपमध्ये सलग 2 सामने गमावले. कांगारुंनी मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत 4 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सेमी फायमलमधील शर्यतीतील आव्हान कायम ठेवलंय. मात्र इंग्लंड विरुद्धचा सामनाही कांगारुंसाठी महत्त्वाचा आहे. तर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपलेलंय. मात्र त्यानंतरही इंग्लंडचा हा सामना जिंकून आगामी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवलेलाय. मात्र ऑस्ट्रेलियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. मार्कस स्टोयनिस आणि कॅमरुन ग्रीन यांचा ग्लेन मॅक्सवेल आमि शॉन मार्श यांच्या जागी समावेश करण्यात आलेला आहे. आता हे दोघे आरपारच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध कशा पद्धतीने योगदान देतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 9 वेळा भिडले आहेत. ही दहावी वेळ आहे. या 9 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला 3 मॅच जिंकण्यात यश आलंय.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद आणि मार्क वुड.