मुंबई | टीम इंडिया आता अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 अशा एकूण 3 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात या दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 मोहिमेला सुरुवात करणार आहे.
टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला. चेतेश्वर पुजारा आणि इतर अनुभवी खेळाडूंनी या महामुकाबल्यात घोर निराशा केली. त्यामुळे आता विंडिज विरुद्धच्या कसोटी आणि एकूणच दौऱ्यासाठी टीम इंडियात बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दरम्यान विंडिज विरुद्धच्या टेस्ट रीसिरजासाठी टीमची घोषणा केली आहे.
विंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी विराट कोहली याला कर्णधार करण्यात आलंय. तर शुबमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक आणि प्रसिद्ध कृष्णा या पाच जणांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, इशान किशन आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर चेतेश्वर पुजारा याला टीममधून वगळण्यात आलंय. तसेच रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या नावाने करण्यात आलेलं हे ट्विट फेक आहे. बीसीसीआयच्या नावाने असलेल्या ट्विटर अकाउंटमधील बायोमुळे क्रिकेट चाहत्यांना या पोस्टवर चटकण विश्वास बसला. बीसीसीआयचं अधिकृत ट्विटर खातं असं या फेक ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये आहे. त्यामुळे चाहत्यांनाही शंका घ्यायला वाव राहिला नाही. मात्र जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा हे फेक ट्विट असल्याचं स्पष्ट झालं.त्यामुळे थोडक्यात काय तर, विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही.
फेक ट्विट फेक टीम
India Test squad for West Indies Tour :
Virat Kohli (C), Shubman Gill (VC), Jaiswal, Ruturaj, Rahane, Sarfaraz, I Kishan (WK), KS Bharat (WK), Jadeja , Ashwin, Kuldeep, Shardul, Siraj, Umran, Prasidh
— BCCI (@BCCI___0) June 22, 2023
फेक ट्विटनुसार टीम इंडिया | विराट कोहली (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर) , रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.