Video : तिकिटासाठी मारामार, राडा, हाणामारी अन् लाठीचार्ज, कटकमधील घटना

| Updated on: Jun 10, 2022 | 11:49 AM

यावेळी तिकिटांसाठी महिलांचा राडा पहायला मिळाला. यानंतर पोलिसांना देखील गोंधळ वाढल्याचं बघताच सौम्य लाठीचार्ज केला.

Video : तिकिटासाठी मारामार, राडा, हाणामारी अन् लाठीचार्ज, कटकमधील घटना
तिकिटासाठी मारामार
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेची खास गोष्ट म्हणजे या मालिकेतील काही सामने अशा स्टेडियममध्ये खेळवले जातायेत. ज्याठिकाणी गेल्या काही वर्षांत क्रिकेटचे सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळे लोकांना सामने पाहण्याबद्दल चांगलीच उत्सुकता आहे. मालिकेतील पहिला सामना काल म्हणजे गुरुवारी झाला. त्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी कशाचीही चिंता करत नाहीत. कडक उष्णता असूनही स्टेडियमजवळ फुल्ल भरून गेलं होतं. दिल्लीनंतर पुढचा सामना 12 जूनला ओडिशातील कटक (Cuttack)
T20 मध्ये होणार आहे. याठिकाणी देखील सामन्याबद्दल क्रेझ आहे. विशेष म्हणजे याठिकाणी क्रिकेटचे तिकीट मिळवण्यासाठी देखील स्पर्धा लागल्याचं दिसतंय. याच शर्यतीत गुरुवारी प्रचंड गोंधळ उडाला. काही महिलांनी मारहाणही केली. यावेळी तिकिटांसाठी महिलांचा राडा पहायला मिळाला. यानंतर पोलिसांना देखील गोंधळ वाढल्याचं बघताच सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान, हा व्हिडीओ (Viral Video) चांगलाच व्हायरल झालाय.

गोंधळाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, पाहा

नेमकं काय झालं?

ओडिशाच्या कटकमध्ये 12 जूनला खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटांच्या विक्री सुरू आहे. या तिकिटांच्या विक्रीदरम्यान गुरुवारी बाराबती स्टेडियमवर गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. यावेळी महिलांना तिकिट घेण्यासाठी तुफान गर्दी केली होती. तिकिटांसाठी महिलांमध्ये राडा झाल्याचंही दिसून आलं. यावेळी महिलांना एकमेकींचे केस धरून हाणामारी केली. यावेळी वाद वाडताच पोलिसांनी क्रिकेटप्रेमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. यासंंबंधिची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.

तिकीट विक्रीवरुन गोंधळ

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, काही महिला रांगेच्या पुढे आल्या. त्यामुळे तिकीट विक्रीवरून गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त प्रमोद रथ म्हणाले की, ‘सुमारे 40 हजार लोक उपस्थित होते. तर काउंटरवर फक्त 12 हजार तिकीट विक्री होते. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य बळाचा वापर करावा लागला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा केला जातो आहे की काही महिला तिकिटासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेची आघाडी

दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा 7 विकेट्सनी पराभव झाला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.