IPL 2022, Orange cap : ऑरेंज कॅपच्या टॉप फाईव्हमध्ये पुन्हा डेव्हिड वॉर्नर, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या…

| Updated on: May 22, 2022 | 7:53 AM

शिखरला धक्का देत डेव्हिड ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पुन्हा दाखल झालाय. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 432 धावा केल्या आहेत.

IPL 2022, Orange cap : ऑरेंज कॅपच्या टॉप फाईव्हमध्ये पुन्हा डेव्हिड वॉर्नर, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या...
David Warner
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. या एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने आतापर्यंत 629 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 537 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी डी कॉक आहे. त्याने 502 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिस आहे. त्याने 443 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. पाचव्या स्थानी शिखर धवन होता. शिखरला धक्का देत डेव्हिड ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पुन्हा दाखल झालाय. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 432 धावा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

मुंबईकडून कोणी किती धावा केल्या?

मुंबईकडून इशान किशनने दमदार फलंदाजी केली. त्याने 35 चेंडूत 48 धावा फटकावल्या. रोहित शर्मा पुन्हा फेल ठरला. त्याला नॉर्खियाने झेलबाद केलं. ऋषभ पंतने डेवाल्ड ब्रेव्हिसचा सोपा झेल सोडला. ब्रेव्हिसने 37 धावा केल्या यात एक चौकार आणि तीन षटकार होते. तिलक वर्माने 21 धावा केल्या. तो ही मोक्याच्याक्षणी नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रमणदीपने 6 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. यात दोन चौकार होते. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स,  लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे प्लेऑफमध्ये दाखल होणारे चार संघ आहेत.