मुंबई: आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. यंदाही पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. दरम्यान, कालच्या सामन्यातील पंजाबच्या विजयाने चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झाले आहेत का?, पाहुया
पर्पल कॅपच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 18 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजन आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 15 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो यांनी 14 विकेट आयपीएलच्या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने तेरा विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानी उमेश यादव आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये अकरा विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे.धवनने सोमवारी सीएसके विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. शिखर धवनचं दिल्ली कॅपिटल्सकडून आय़पीएल करीयर सुरु झालं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. 2019 ला पुन्हा तो दिल्लीच्या संघात आला. त्याआधी तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला.
इतर बातम्या
Royal Enfield Fire : तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ