मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 24 धावांनी पराभव केला. या विजयानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर पराभवामुळे लखनौचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि लखनौला 8 बाद 154 धावांवर रोखले. राजस्थान 13 सामन्यांतून 8 व्या विजयासह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनौची 13 सामन्यांतून पाचव्या पराभवानंतर 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दरम्यान, कालच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षक रियान परागनं असं काही कृत्य केलं की ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. त्याच्या या कृत्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नोटिझन्सकडून या कृतीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायेत.
This idiot Riyan Parag fooled every on TV thn doing nautanki… Should kicked him out of this tournament.
No. 1 Wahiyaat Player.#LSGvRR pic.twitter.com/Kfrcf8o1lU हे सुद्धा वाचा— Colorful Yellow (@iomxprakash) May 15, 2022
लखनौच्या डावाच्या 20व्या षटकात रियान परागने प्रसिद्ध कृष्णाच्या लाँग-ऑनवर मार्कस स्टॉइनिसचा झेल घेतला. त्याचा झेल घेत राजस्थानने आपले दोन गुण निश्चित केले. मात्र, झेल पकडल्यानंतर परागने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या अगदी जवळ नेला आणि त्याला चेंडूला जमिनीला स्पर्श करायचा आहे असे वाटले. जरी तो हे विनोद करत होता, परंतु त्याच्या या कृतीमुळे पराग आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.
This Is Why I Don’t Like This Boy Riyan Parag. Yes You Have Taken A Catch, But Criticising Umpires For Their Decision Is Bizarre. As A Batsman You Have Not Done Anything, But Showing Off Always.
Grow Up?? pic.twitter.com/N3d4jynEJD
— Vaibhav Bhola ?? (@VibhuBhola) May 15, 2022
सोशल मीडियावरील चाहत्यांचे परागशी नेहमीच वेगळे नाते राहिले आहे. पण यावेळी मॅथ्यू हेडन आणि इयान बिशपसारखे समालोचकही 20 वर्षीय क्षेत्ररक्षकाच्या सेलिब्रेशनवर नाराज दिसले. इतर चाहत्यांनी या कृत्याबद्दल परागवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी परागनं केलेल्याबद्दल संताप दाखवला. एका यूजरने लिहिले की, ‘या मूर्ख रियान परागने टिव्हीवर नौटंकी करून सर्वांना मूर्ख बनवले… त्याला या स्पर्धेतून बाहेर काढले पाहिजे. क्रमांक 1 मूर्ख खेळाडू. आणखी एका युजरने मीम्स लिहून लिहिले, तू लहान मुलगी आहेस का?’ अशा प्रकारे वेगवेगळे ट्विट्स काल परागच्या विरोधात दिसून आले. परागची ही कृती त्याला चांगलीच महागात पडली. नेटिझन्सने त्याला ज्या प्रकारे लक्ष्य केलं. त्यानंतर परागला चांगलाच अपमान सहन करावा लागला.