Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर याने नाहीतर ‘या’ खेळाडूने ठोकलेली पहिली डबल सेंच्युरी

| Updated on: Feb 26, 2023 | 5:27 PM

2010 मध्ये सचिनने 200 धावा करत वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरूद्ध द्विशतक केलं होतं. मात्र तुम्हाला माहित आहे का सचिनच्या आधीही एका खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर याने नाहीतर या खेळाडूने ठोकलेली पहिली डबल सेंच्युरी
Sachin Tendulkar
Follow us on

मुंबई : भारताचा माजी खेळाडू आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. यातील काही विक्रम असे आहेत की जे कधी रचले जातील असं कोणाला वाटलंही नव्हतं. यातील एक म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक मारणं म्हणजे आस्मान ठेंगण करण्यासारखा विक्रमही सचिनने केला होता. 2010 मध्ये त्याने 200 धावा करत वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरूद्ध द्विशतक केलं होतं. मात्र तुम्हाला माहित आहे का सचिनच्या आधीही एका खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे.

16 डिसेंबर 1997 रोजी बेलिंडा क्लार्कने ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क यांच्यातील एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने हे द्विशतक केलं होतं. फक्त 200 नाहीतर 229 धावा या खेळाडूने केल्या होत्या. हे द्विशतक दुसरं तिसरं कोणी नसून ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू बेलिंडा क्लार्क आहे. 1997 मध्येच बेलिंडाने हा विक्रम आपल्या नावावर केला होता, मात्र हे फार कमी लोकांना माहित आहे.

कायम पुरूष क्रिकेटला डोक्यावर घेणाऱ्या क्वचित क्रीडा रसिकांना याची माहिती आहे. सचिनने 2010 साली केला खरा पण 13 वर्षांआधीच एका महिला क्रिकेटरने आपल्या नावावर केला होता. जो विक्रम आधी कोणत्याही पुरूष क्रिकेटपटूंना जमला नव्हता तेव्हा बेलिंडा क्लार्कने 229 धावांची दमदार खेळी केली होती.

बेलिंडाने मैदानात चौकारांचा पाऊस पाडत या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 412 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा डॅनिश संघ अवघ्या 49 धावांत गारद झाला होता. महिलांमध्ये हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या या डॅशिंग खेळाडूने आपल्या नावावर केला होता.

दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये बेलिंडा क्लार्कसह आणखी एका खेळाडूने द्विशतक केलं आहे. न्यूझीलंडच्या अमिला केरने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध 145 चेंडूत नाबाद 232 धावांची खेळी केली होती. तर भारताच्या महिला संघामधील अनुभवी खेळाडू दीप्ती शर्मा हिने 2017 मध्ये 188 धावांची खेळी केली होती.