मुंबई : क्रिकेटमध्ये झेल सुटणं होत असतं. प्रेशरमध्ये अनेकदा तशा चुका होत असतात. पण प्रत्येक सामन्यात तसंच होणं म्हणजे काहीतरी गणित चुकतंयय. पाकिस्तानचे खेळाडू वारंवार त्याच त्याच चुका करत आहेत. सोपे झेल सोडून जगभरात हसं करून घेत आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानने त्याच चुका केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीतही असंच काहीसं पाहायला मिळालं.आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी माती खाल्ली. केन विल्यमसनला दोनदा जीवदान दिलं. त्या संधीचं त्याने सोनं केलं. 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 9 चौकार ठोकले. तर केन विल्यमसनने डेरिल मिचेलसोबत 78 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 गडी गमवून 226 धावा केल्या आणि विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं. पण पाकिस्तानचा संघ 180 धावा करू शकला आणि 46 धावांनी पराभव झाला.
माजी कर्णधार बाबर आझमने झेल सोडण्याची पहिली चूक केली. अब्बास अफ्रिदीच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनचा झेल सोडला. मिड ऑनवर फिल्डिंग करणाऱ्या बाबरच्या हातात झेल होता. पण चेंडू काही पकडू शकला नाही. त्यामुळे अब्बासला डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय उरला नाही.
He ran well, got in great position just couldn't hold on, a catch drop by babar's standards. #PAKvsNZpic.twitter.com/BSrOMMcbG7
— Taha (@taha_tj30) January 12, 2024
बाबर आझमनंतर चाचू नावाने प्रसिद्ध असलेल्या इफ्तिखार अहमदनेही झेल सोडला. हा झेल देखील केन विल्यमसनचा होता. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं. ओसामा मीरच्या गोलंदाजीवर झेल आला होता. शॉर्ट थर्ड मॅनवर फिल्डिंग करताना झेल इफ्तिखारच्या हाती आला होता. एका हातात पकडण्याचा प्रयत्न केला. पण संधीचं सोनं करू शकला नाही.
Iftikhar 🤷🏻♂️🤦🏻
Williamson survive 👀#PAKvsNZ #Cricket pic.twitter.com/tidcbUjgkQ— Abdullah 𝕏 (@iamTayyab_56) January 12, 2024
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, एडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साऊदी, ईश सोधी, बेन सियर्स
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, सइम अयुब, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमेर जमाल, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ