आधी क्रिकेटपटूनं राडा घातला, त्यानंतर अटक, आता थेट हॉस्पिटलध्ये

| Updated on: Sep 26, 2022 | 7:05 PM

आधी एका महिलेच्या घरासमोर राडा घातला. त्यानंतर त्या दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचं नेमकं काय झालं. वाचा...

आधी क्रिकेटपटूनं राडा घातला, त्यानंतर अटक, आता थेट हॉस्पिटलध्ये
ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा कारनामा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक दिग्गज क्रिकेटपटू (Cricketer) सध्या चांगलाच चर्चेत आलाय. खरं तर हा क्रिकेटपटू सध्या अडचणीत सापडला आहे. या मागचं कारण देखील तोच आहे. त्याच्या या सगळ्या करामती पाहता अनेकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. पण, एका दिग्गज क्रिकेटपटूनं असं केलं तरी काय की ज्यामुळे टीकेचा तो धनी ठरलाय. त्याच्यावर कुणीही विश्वास दाखवायला देखील तयार नाही. याचविषयी आम्ही सांगणार आहोत.

कोण आहे तो क्रिकेटर?

सध्या ऑस्ट्रेलियाच्या ज्या दिग्गज क्रिकेटरची चर्चा सुरु आहे. त्याचं नाव माईकल स्लेटर असं आहे. यानं ऑस्ट्रेलियासोबत खुप दमदार कामगिरी केली आहे. त्यानं 74 कसोटी सामन्यात 5312 धावा आणि 42 वनडेमध्ये 987 धावा काढल्या आहेत. पण, तुम्ही म्हणाल हा दिग्गज असून त्यानं असं काय काम केलंय की ज्यामुळे त्याच्यावर टीका होतेय. तर जाणून घ्या…

नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज असलेल्या माईकलला नॉर्थ सिडनी याठिकाणच्या त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यानं एका महिलेच्या घरासमोर राडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्याच्या या वादामुळे त्रस्त झालेल्या त्या महिलेनं पोलिसांना फोन केला. त्यानंतर माईकलला अटक करण्यात आली.

थेट हॉस्पिटलमध्ये

माईकलला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मानसिक आरोग्य ठिक नसल्याचं कारण पुढे करत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. स्लेटर यावेळी मारहाण, धमकावणे यासह अनेक गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली जमिनावर आहे. पण, एका महिलेला धमकी देणं यासह अनेक गोष्टी पाहता तेथिल पोलिसांनी त्याच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. संबंधित महिलेशी गैरवर्तन करू नये, असंही ठणकावण्यात आलंय.

कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द

माईकलची परिस्थिती आणि त्याचं मानसिक आरोग्य पाहता कौटुंबिक हिंसाचारासारखा गुन्हा रद्द करून त्याला मानसिक आरोग्यावर उपचार करण्याच सांगण्यात आलंय. तसाच आदेशच देण्यात आलाय.

84 वेळा फोन

माईकलनं त्याच्या जुन्या प्रेयसीला तब्बल 84 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. माईकलला एका स्थानिक कोर्टानं तीस आठवडे मानसिक आरोग्य युनिटमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जातंय.