टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाला एकप्रकार उतरती कळा लागली आहे. श्रीलंकेतील वनडे मालिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका गमवण्याची वेळ आली आहे. या सर्व पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी बीसीसीआयने बैठक बोलवली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत मोठे निर्णय घेतले गेले. आता विदेशी दौऱ्यावर खेळाडू त्यांच्या पत्नींसोबत जास्त दिवस राहू शकणार नाही. इतकंच काय तर ट्रॅव्हेलसह खेळाडूंच्या सामानाच्या वजनाबाबत नियमात बदल केले जाणार आहेत. चला जाणून घेऊयात काय बदल केले ते.
विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर एकीकडे मालिका सुरू असताना खेळाडूंचा फॅमिली टाईम सुरु असतो असं पाहिलं गेलं आहे. खेळाडू जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत व्यतित करतात. त्याचा परिणाम खेळावर होतो. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयने एक नियम तयार केली आहे. 45 दिवासांपेक्षा जास्त असलेल्या दौऱ्यावर खेळाडूंना पत्नींसोबत जास्तीत जास्त 14 दिवस राहता येईल. तसेच कमी दिवसांच्या दौऱ्यावेळी फक्त 7 दिवसांची मुभा असेल.
बीसीसीआयने पूर्ण संघाला एकत्र प्रवास करणं अनिवार्य केलं आहे. खेळाडूंना स्वत:च्या वाहनाने किंवा अन्य वाहनाने प्रवास करण्याची अनुमती नसेल. खेळाडूंना टीम बसनेच प्रवास करावा लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडू वेगवेगळे फिरताना दिसले.
बीसीसीआयने बैठकीत खेळाडूंच्या वजनाबाबतही निर्णय घेतला आहे. आात खेळाडूंच्या सामानाचं वजन हे 150 किमीपेक्षा जास्त असेल तर बीसीसीआय त्याचे पैसे देणार नाही. 150 पेक्षा वरील वजनासाठी खेळाडूला स्वत: पैसे भरावे लागतील.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मॅनेजवरही कारवाईचा बडगा उचलला आहे. टीम इंडियाच्या दौऱ्यावर हेड कोचसह कधीही मॅनेजर गेला नव्हता. पण गंभीरसोबत त्याचा मॅनेजर ट्रॅव्हेल करत होता. तसेच व्हिआयपी बॉक्समध्ये बसल्याचं दिसून आलं. आता गौरव गंभीरसोबत ट्रॅव्हेल करू शकणार नाही. तसेच त्याला व्हिआयपी बॉक्समध्येही बसण्याची परवानगी मिळणार नाही. हा नियम अन्य प्रशिक्षकांच्या मॅनेजरसाठीही लागू होणार आहे.
भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली तर त्याच्या पगार कापला जाण्याची शक्यता आहे. असं केल्यास खेळाडू खेळाप्रती अधिक उत्तरदायी राहतील, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. सामना गमावला तर त्याचा परिणाम खेळाडूंच्या खिशावर होऊ शकतो.