IPL 2022 : “महेंद्रसिंग धोनीची ती सर्वात मोठी चूक होती” विरेंद्र सहवागने दाखवल्या कॅप्टनकुलच्या त्रुटी…
काही दिवसांसाठी रवींद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन्सीची धुरा होती. पण आता कॅप्टन्सीची कमान आता पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या हाती आली आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत वक्तव्य केलंय.
1 / 5
कॅप्टन कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनी अनेकांसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. त्याची खेळी अनेकांना आवडते. पण त्याने एक चूक केल्याचं माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने म्हटलंय.
2 / 5
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2022 मध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 10 पैकी 7 सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे आयपीएल ट्रॉफीच्या शर्यतीतून हा संघ जवळपास बाहेर पडला.
3 / 5
काही दिवसांसाठी रवींद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन्सीची धुरा होती. पण आता कॅप्टन्सीची कमान आता पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या हाती आली आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत वक्तव्य केलंय. त्याने चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद बदली करण्यावर भाष्य केलंय.
4 / 5
वीरेंद्र सेहवागने याच्या आगोदरही अनेकदा समाचार घेतला आहे
5 / 5
यंदाची आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. आपल्यानंतर रवींद्र जडेजा कॅप्टन असेल, अशी घोषणा त्याने केली. पण रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला करिश्मा दाखवता आला नाही. त्यामुळे संघाने पुन्हा एकदा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएस धोनी चेन्नईचा कर्णधार झाला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने एक सामना जिंकला खरा पण एक पराभवही त्यांच्या वाट्याला आला.