दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांंगलादेश संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईमध्ये पार पडणार आहे. यंदा मार्च महिन्यानंतर टीम इंडियाने एकही कसोटी सामना खेळला नाही. तर पाहुणा संघ बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केल्याने मोठ्या आत्मविश्वासाने ते मैदानात उतरतील. टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणं काही सोप्पे नाही. अशातच या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केली आहे.
पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर हरवण काही सोपे काम नाही त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंचे अभिनंदन. पण भारतीय संघ पूर्ण वेगळा आहे. घरच्या मैदानात किंवा विदेशात दोन्हीकडे भारतीय संघ दमदार कामगिरी करतो. भारताची फलंदाजी मजबूत आहे. मला वाटत नाही बांगलादेश भारतामध्ये जिंकेल, ही मालिका भारतीय संघ जिंकेल, पण भारतालाही बांगलादेश चांगली टक्कर देईल. कारण पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असणार असल्याचं सौरव गांगुली याने म्हटलं आहे.
पाकिस्तानमध्ये मला खरोखरच टॅलेंटची कमतरता दिसत आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान संघाचा विचार करत होतो तेव्हा मियांदाद, वसीम, वकार, सईद अन्वर, मोहम्मद युसूफ आणि युनूस खान या खेळाडूंची आठवण येते. या खेळाडूंप्रमाणे आताच्या संघाकडे टॅलेंट पाहायला मिळत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्याा लोकांना याकडे लक्ष द्यावे लागेल, असंही गांगली म्हणाला.
दरम्यान, बांगलादेशने कसोटी मालिकेमध्ये भारताचा 2-0 ने पाकिस्तानचा पराभव केला होता. शान मसूद हा पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करत होता. मात्र बांगलादेशने त्यांच्याय घरच्या मैदानावर त्यांना पराभवाची धूळ चारली. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 ते 23 सप्टेंबरमध्ये चेन्नईमध्ये तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.