मुंबई : क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी ओपनर सुधीर नाईक यांचं अल्पशा आजाराने मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. बाथरूममधील फरशी डोक्यात पडल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार चालू होते मात्र ते कॉमात गेले होते आणि यामध्येच त्यांचं निधन झालं आहे. सुधीर नाईक यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
भारताने 1974 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात सुधीर नाईकने लिटल मास्टर ब्लास्टर सुनील गावस्करसोबत सलामीला आले होते. एकदिवसीय सामन्यात भारतासाठी नाईक यांनी पहिला चौकार चार मारला होता. इतकंच नाहीतर 2011 च्या विश्वचषकात नाईक यांनी वानखेडेची खेळपट्टी तयार केली होती.
सुधीर नाईक हे मुंबई क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार होते. नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघाने 1970-71 हंगामात रणजी विजेतेपद पटकावलं होतं. 1974 सुधीर नाईक यांनी इंग्लंड दौऱ्यावर बर्मिंगहॅम कसोटीत पदार्पण केलं होतं.
जिथे त्यांनी दुसऱ्या डावात 77 धावा करत आपले एकमेव अर्धशतक झळकावलं हों. नाईक यांनी 85 प्रथम श्रेणी सामने खेळले त्यामध्ये 35 पेक्षा जास्त सरासरीने 4376 धावा केल्या ज्यात दुहेरी शतकासह सात शतकांचा समावेश आहे.