क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात केलं दाखल

| Updated on: Dec 23, 2024 | 3:43 PM

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत आहे. असं असताना त्याची प्रकृती शनिवारी खालावल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Image Credit source: Twitter
Follow us on

दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी पार्क मैदानात त्यांचं स्मारक नुकतंच उभारण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. पण विनोद कांबळीची स्थिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला नीट उठताही येत नव्हता आणि बोलताही येत नव्हतं. त्यामुळे त्याची अशी स्थिती पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू मदतीला धावले होते. कपिल देव यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली होती. असं असताना विनोद कांबळीच्या चाहत्यांसाठी एक धास्ती वाढवणारी बातमी समोर आली आहे. विनोद कांबळीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे तसेच सर्वच तपासण्या केल्या जात आहेत.

विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पण त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान विनोद कांबळीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विनोद कांबळीची क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात एकदम दमदार झाली होती. 1991 मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 1993 मध्ये कसोटीत खेळला. त्याची खेळी पाहून अनेका हा भविष्यात खूप काही करेल असं वाटत होतं. पण नियतीचा खेळ पालटला आणि विनोद कांबळीचे ग्रह फिरले. 2000 च्या दशकात विनोद कांबळीचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला. म्हणून त्याला 2000 सालानंतर टीम इंडियात स्थान मिळालं नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळला होता. त्यानंतर टीममध्ये कमबॅकसाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.