मुंबई | आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला आता मोजून महिन्याभरात कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडिया आशिया कप 2023 स्पर्धेतून वर्ल्ड कपची जोरदार तयारी करतेय. वर्ल्ड कपसाठी येत्या काही तासांमध्ये भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. यंदा भारतात वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे जोरदार तयारी सुरु आहे. या दरम्यान अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आपल्या हटके स्टाईल अंपायरिंगने असंख्य क्रिकेट चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या दिग्गज माजी अंपायरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
भारताचे माजी अंपायर पिलू रिपोर्टर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पिलू रिपोर्टर यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिलू रिपोर्टर यांची अंपायर म्हणून 28 वर्षांची कारकीर्द राहिली. रिपोर्टरने 34 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली, ज्यात 14 कसोटी आणि 22 एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. रिपोर्टर अंपायर म्हणून कारकीर्दीला सुरुवात करण्याआधी वीज विभागात कार्यरत होते.
पीलू रिपोर्टर यांची हटके अंपायरिंग
Former Indian Umpire Piloo Reporter passed away at the age of 84.
He stood in 14 Tests and 22 ODIs as an umpire(including in World Cup 1992, where he was the only Indian umpire).
Started his career at an early age of 29 in Ranji Trophy, he became the first pair of neutral… pic.twitter.com/BMbQICgmi7
— Cricketopia (@CricketopiaCom) September 3, 2023
पीलू रिपोर्टर यांना 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये अंपायरसाठी निवड करण्यात आली. तसेच पीलू रिपोर्टर हे पहिले तटस्थ अंपायर होते. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान याने 1986 मध्ये पीलू रिपोर्टर आणि वीके रामास्वामी या दोघांना विंडिजमध्ये अंपायरिंगसाठी बोलावलं होतं.
पीलू रिपोर्टर हे क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्याआधी एमएसईबीत कामाला होते. त्या दरम्यान एमसीए तेव्हाचं बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने अंपायर जागांसाठी पदभरती काढली. पीलू रिपोर्टर याने अर्ज केला. पीलू रिपोर्टर यांची तेव्हा निवड झाली नाही. पीलू यांनी न खचता स्थानिक क्रिकेटकडे मोर्चा वळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी करण्याआधी त्यांनी रणजी सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं.
इंग्लंड आणि बोर्ड प्रेसीडेंट इलेव्हन यांच्यात 8 जानेवारी 1993 रोजी लखनऊमध्ये सामना पार पडला. पीलू रिपोर्टरने यांनी त्या सामन्यात अंपायरिंग केली. हा सामना एकूण 3 दिवस चालला. पीलू रिपोर्टर यांना 2 वर्षांआधी क्रिकेटर्स फाउंडशेनकडून 75 हजार रुपयांची आर्थित मदत देण्यात आली. पीलू रिपोर्टर हे मुंबई क्रिकेटचे स्टार होते.